बीड जिल्हाहा लेख बीड जिल्ह्याविषयी आहे. बीड शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
बीड जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासाविषयी पुराणांमधून उल्लेख येतो असे सांगतात. बीड जिल्हा थंड हवेचे ठिकाणे चिंचोली, सौताडा, चिखली आहेत माजलगाव येथें सिंदफणा नदी असून तिच्यावर धरण बांधलेले आहे. गंगामासला येथें मोरेश्वर गणपती मंदिर आहे. तेलगावं येथें सुदेर्रावजी सोळके साखर कारखना आहे. माजलगाव येथें एक फार जुने महादेवाचे मंदिर आहे येळंबघाट बस स्थानका पासून सुमारे 2 ते 3 किमी अंतरावर महादेवाचे जुने मंदिर खूप प्रसिद्ध आहे. येळंब येथील ग्रामीण लोकांच्या माहिती नुसार, हे मंदिर सुमारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळा पूर्वी राक्षसांनी महादेवाची तपस्या करण्यासाठी केवळ एकारात्रीत उभारले आहे . या मंदिराची विशेषता म्हणजे हे मंदिर जमिनीच्या वरती तर आहेच परंतु महादेवाचे शिवलिंग हे जमिनीच्या अंतर्भागात आहे . या शिवलिंगा वरती पाणी अर्पण करण्यासाठी राक्षसांनी जमिनीच्या अतून एक भुयार बनवले आहे .हे भुयार जवळ जवळ 500मी ते 800मी दूर एक नदी आहे त्या नदीला मिळते व नदीतील पाणी शिवलिंगआला स्नान घालते . This information is presented by UGALMUGALE ANIKET ATMARAM.... बीड जिल्ह्याची वैशि..ष्ट्येबीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा सहकारी चळवळींसाठीही ओळखला जातो. महाराष्ट्र राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे. बीड जिल्ह्याची दुष्काळी भाग म्हणून ओळख आहे. बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात मराठी व्यतिरिक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील बोलल्या जातात. बीड हे मराठवाड्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. मराठीतील आद्य कवी मुकुंदराज आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यात आहे. बीड शहरातून बिंदुसरा नदी वाहते. मुर्तुजा शाह निजामच्या काळात बांधली गेलेली बीडची खजाना विहीर (खजाना बावडी) प्रसिद्ध आहे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. माजलगाव येथें सिंदफणा नदी असून तिच्यावर धरण बांधलेले आहे. गंगामासला येथें मोरेश्वर गणपती मंदिर आहे. तेलगावं येथें सुदेर्रावजी सोळके साखर कारखना आहे. माजलगाव येथें एक फार जुने महादेवाचे मंदिर आहे. बीड हे सिताफळासाठी प्रसीद्ध आहे. माजलगाव तालुक्यात मंजरथ हे गाव आहे , ते दक्षिण कशी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या या जिल्ह्यात झाल्याचे सांगितले जाते. बीड जिल्ह्यात छोटेवाडी नावचे एक छोटे गावं आहे. बीड जिल्ह्याच्या चतुःसीमापूर्वेला : परभणी प्रशासकीय विभागबीड जिल्ह्याचे विभाजन २ उपविभागांमध्ये करण्यात आले आहे. त्यांचे विभाग पुढीलप्रमाणे आहेत.
या उपविभागांचे विभाजन ११ तालुकामध्ये पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे. शिरूर व वडवणी या तालुक्यांची निर्मिती २६ जून १९९९ला करण्यात आली. राजकीय संरचनालोकसभा मतदारसंघ (१) :बीड (लोकसभा मतदारसंघ) दैनिक बातमीपत्र लोकमत मराठीभौगोलिक माहितीबीड जिल्हा समुद्रापासून दूर आहे. बीड जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे. जिल्ह्यातील उत्तर भाग सपाट मैदानी आहे. जिल्ह्याच्या मध्य-दक्षिण भागात बालाघाटचे डोंगर आहेत. येथे चिंचोली, नेकनूर हे भाग येतात. या भागास मांजरथडी असेही म्हणतात. मांजरसुभ्याहून बीडकडे जाताना पालीघाट लागतो. गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. या भागास गंगथडी असेही म्हणतात. हा सुपीक भाग गाळापासून बनला आहे. यात गेवराई, माजलगाव व परळी या तालुक्यांचा समावेश होतो. हवामानजिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणत: उष्ण व कोरडे आहे. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो. मे महिन्यात तापमान महत्तम असते. डिसेंबर महिन्यात तापमान कमीतकमी असते. उन्हाळ्यात दिवसा तापमान बरेच वाढत असले तरी रात्री ते कमी होते. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील उंचावरील बालाघाट डोंगराळ प्रदेशातील हवामान काहीसे थंड आहे तर सखल भागात ते उबदार व थोडेसे दमट आहे. अंबेजोगाई तालुक्यातील हवामान अधिकच आल्हाददायक असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधील पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण अतिशय कमी असून पाऊस अनियमित स्वरूपाचा आहे. त्यामुळे जिल्ह्याचा बराचसा भाग अवर्षणग्रस्त आहे. जो पाऊस पडतो त्याचे जिल्ह्यातील वितरणही असमान आहे. पावसाचे प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत गेलेले आढळून येते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील अंबेजोगाई, केज, माजलगाव, परळी, धारूर आदी तालुक्यात तो तुलनात्मकदृष्टया अधिक पडतो तर गेवराई, आष्टी, पाटोदा, शिरूर यांसारख्या तालुक्यात तो खूपच कमी पडतो. जिल्ह्यातील गेवराई, पाटोदा, बीड, माजलगाव, केज, आष्टी या तालुक्यांचा केंद्र शासनाने निश्चित केलेल्या अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश होतो. येथील लोक दुष्काळाचा सामना करतात . जलसिंचनबीड जिल्ह्यात विहिरी, कूपनलिका व नद्या ही पाणीपुरवठ्याची मुख्य साधने आहेत. जिल्ह्यात बीड व आष्टी या भागात विहिरी तुलनात्मकदृष्टया अधिक आहेत. बीड शहरात माजलगाव तलाव व बिंदुसरा तलावातून पाणी पुरवठा होतो. बीड शहराला ऐतिहासिक पाणीपुरवठा करमारी खजाना विहिरीद्वारे होत असे. नद्या
जिल्ह्यातील सिंधफणा, वाण, सरस्वती या गोदावरीच्या उपनद्या आहेत. रेना नदी, वाण नदी व सरस्वती नदी या बीड जिल्ह्यातील मध्य डोंगराळ भागात उगम पावतात व दक्षिणकडे वाहत जाऊन पुढे गोदावरीस मिळतात.
बीड मोठे शहर आहे धरण प्रकल्पबीड जिल्ह्यात २ मोठे, १६ मध्यम व १२२ लघु प्रकल्प आहेत. माजलगाव व मांजरा हे मोठे प्रकल्प आहेत. बीड शहराला माजलगाव व बिंदूसरा प्रकल्पामधून पाणी पुरवठा होतो. इतर धरण प्रकल्प :- मेंगडेवाडी (पाटोदा), सिंदफणा (शिरूर), बेलपारा (शिरूर), महासांगवी (पाटोदा), वाण (परळी) ,बोरणा (परळी) ,बोधेगाव (परळी), सरस्वती (वडवणी), कुंडलिका (वडवणी), वाघेबाभूळगाव (केज), शिवनी (बीड), मणकर्णिका (बीड), सौताडा (पाटोदा), मेहकरी (आष्टी), कडा (आष्टी), कांबळी (आष्टी), रूटी (आष्टी), तलवार( आष्टी), हिंगेवाडी (शिरूर), नागतळवाडी, वेलतुरी, लोणी, पारगाव, कोयाळ, खुंटेफळ, पिंपळा, गोलंग्री, सुलतानपूर, कटवट, जरुड, जुजगव्हाण, ईट, मैंदा, अंबा, मन्यारवाडी, शिंदेवाडी, मादळमोही, दासखेड, इंचरणा, मस्साजोग, कारंजा, होळ, मुळेगाव, जनेगाव, तांदुळवाडी, पहाडीपारगाव, साळींबा, नित्रुड, शिंदेवाडी, वांगी, चिंचोटी, तिगाव, लोणी, सांगवी, ढालेगाव, मांजरा (धनेगाव), मोरफळी तलाव (आसरडोह) वगैरे.. [४] [५] [६] पिके
जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात वेगवेगळी पिके घेतात. ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे खूप उत्पन्न असलेले प्रमुख पीक असून ते दोन्ही खरीप व रब्बी अशा हंगामांत घेतले जाते. शिवाय कापूस हे महत्त्वाचे खरीप नगदी पीक आहे. बाजरी, गहू, तूर, मूग, उडीद, तीळ, जवस, मसूर, सोयाबीन, मिरची, ऊस, कांदा, वगैरे अन्य पिकेही जिल्ह्यात घेतली जातात.. बीड जिल्हा हा तेलबिया व भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे. जिल्ह्यातील पाटोदा, बीड, माजलगाव, अंबेजोगाई, केज, शिरूर, आष्टी या तालुक्यात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. बाजरीची शेती प्रामुख्याने पाटोदा, शिरूर, आष्टी, माजलगाव, केज या तालुक्यात केली जाते. भुईमुगाचे उत्पादन प्रामुख्याने आष्टी, अंबेजोगाई, केज येथे होते. कापूस उत्पादनात आष्टी, माजलगाव, बीड व गेवराई तालुके अग्रेसर आहेत. आष्टी, केज, माजलगाव, बीड, गेवराई व वडवणी या तालुक्यात ऱब्बी ज्वारी होते. आष्टी, केज, माजलगाव, बीड, गेवराई या तालुक्यात गहू पिकतो. आष्टी, पाटोदा, बीड व केज येथे हरभऱ्याचे उत्पादन निघते. करडईची लागवड आष्टी, माजलगाव, गेवराई इत्यादी तालुक्यामध्ये केली जाते. जिल्ह्यात बागायती शेतीसुद्धा थोड्या प्रमाणात होते. उसाची लागवड आष्टी, बीड, माजलगाव, गेवराई, अंबेजोगाई इत्यादी तालुक्यामध्ये केली जाते. बीड, अंबेजोगाई या तालुक्यांत द्राक्षाचे उत्पादन होते. गोदावरी व मांजरा या नदयाकाठी कलिंगडाचे उत्पन्न घेतले जाते. आंबे उत्पादनात आष्टी, बीड, अंबेजोगाई, नेकनूर आघाडीवर आहेत. नेकनूर येथे काला पहाड व अंबेजोगाई येथे पेवंदी हे आंबे प्रसिद्ध आहेत. याशिवाय पेरू, मोसंबी, केळी यांचेही उत्पन्न घेतले जाते. [७] या जिल्हय़ात २००८ झालेल्या पशुगणनेनुसार जवळपास साडेदहा लाख जनावरे आहेत. यात साडेसहा लाखांपर्यंत दुधाळ जनावरे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दूधउत्पादन हा शेतकऱ्यांचा मोठय़ा प्रमाणावर जोडधंदा मानला जातो. आठ सरकारी व चार खासगी दूध संघाच्या माध्यमातून दूधसंकलन केले जाते. [८] दळणवळणबीड जिल्ह्यातील वाहतूक प्रामुख्याने रस्तेमार्गाने चालते. बीड शहर महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून साधारणपणे ४५० कि.मी. अंतरावर वसले आहे.
लोहमार्गजिल्ह्यात परळी हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे (२६१ कि.मी.) काम आगामी काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. [९] जिल्ह्यात लोहमार्ग अंबेजोगाई व परळीत आहे. येथे एक लोहमार्ग परभणी (गंगाखेड) तर एक लोहमार्ग लातूर (उदगीर) येथून येतो. घाटनांदूर हे रेल्वे स्थानक आहे. रस्तेराष्ट्रीय महामार्ग
प्रमुख रस्ते
बीडपासून उत्तरेकडे जाणारा मार्ग गेवराईमार्गे जालना व शेवगावकडे जातो. बीडपासून पूर्वेकडे जाणारा मार्ग माजलगावमार्गे पाथरीकडे जातो. दक्षिणेकडे जाणारा मार्ग केजमार्गे कळंबकडे जातो तर दुसरा दक्षिणेकडे मांजरसुभामार्गे उस्मानाबाद व सोलापूरस जातो. बीडपासून पश्चिमेकडे जाणारा मार्ग आष्टीमार्गे अहमदनगरकडे जातो. महत्त्वाचे उद्योगबीड जिल्ह्यात साखर व उद्योग असे अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. जिल्ह्यात १२६ कारखाने आहेत. जिल्ह्यात ७ साखर कारखाने आहेत. जिल्ह्यात ६ सुतगिरण्या आहेत. महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्र परळी येथे आहे.
शिक्षण
आरोग्य
(As per registered Jan 2011)
हे सुद्धा पहाबीड, बीड जिल्ह्यातील गावे तळवट बोरगाव गेवराई पिंपळगाव धस (पाटोदा) संदर्भ
|